मुलांचा सर्वागीण विकास घडविण्यासाठी आनंददायी, शिस्तबद्ध आणि भयमुक्त अशा वातावरणात दिलेले ज्ञान म्हणजे शिक्षण. बालमनावर या गोष्टीचा निश्चितच परिणाम जाणवतो. शाळेमध्ये येत असताना त्यास हवीहवीशी वाटणारी शाळा, शिक्षक व त्यांचे सवंगडी अर्थात वर्गातील विद्यार्थी , दैनंदिन कामकाज करतेवेळी असणारी प्रसन्नता हे विद्याथी यशाचे गमक आहे. मुलाला सुसंस्कारीत करणे आणि त्यातून उद्याचा सुजान नागरिक घडविणे यात शाळेची महत्त्वाची भूमिका हे खरे ! मुलांच्या जडण घडणीच्या या प्रवासात मुलाला लागेल तिथे मदतीचा हात देणं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सजग राहणं यात सर्वांचाच मोलाचा वाटा असावा असे मला वाटते. | विदयार्थी--पालक--शिक्षक या त्रिकोणावस्थेकडे पाहिल्यावर मूलत: प्रथम प्राधान्य निश्चितच विद्यार्थ्यास देणे आवश्यक वाटते. प्रत्येक मूल हे स्वतंत्र विचाराचे असते इतरांच्या मुलाप्रमाणे,पालकांच्या तीव्र इच्छेप्रमाणे, शिक्षकांच्या इच्छेखातर त्याने काय व्हावे यापेक्षाही त्याला काय करावयाचे आहे,त्याच्या अंगी असणा-या सुप्त गुणांचा विकास करणं हे ध्येय पालक शिक्षकांनी अगोदर विचारात घेणे आवश्यक वाटते भारतीय संस्कृती ही बुदि्धिप्रधान संस्कृती आहे; परंतु केवळ बुद्धिच नाहीतर क हाक येथे ऐकली जाईल. निर्मळ बुदिध व निर्मळ हृदय ही वस्तूत: एकरूपच आहेत: बुद्धीत ओलावा असतो.
व निर्मळ हृदयात बुद्धिचा प्रकाश असतो.निर्मळ हृदय व निर्मळ बुद्धी याच्या बळावर भारतीय संस्कृती उभारण्यात आली आहे. असे सानेगुरुजीच्या लेखात आढळते.गुरुकुल पध्दतीनं शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना ध्यानध्यानरणा,योगसाधना अध्यात्मज्ञान, गुरुनिष्ठा, आत्मा हा परमेश्वर ,समजून वागणारी पिढी तयार झाली तर एक सुजान नागरिक तयार होईल. हाच मानस घेउन आम्ही पुढील वाटचाल करीत आहोत..
Vishwatmak Jangli Maharaj Ashram Trust, At. Post. Kokamthan, Shirdi-Kopargaon Road, Tal: Kopargaon, Dist: Ahemadnagar(MH) Pin-423601
+91 7030337337
+91 7588694078
+91 8669600700
+91 8669600900
atmamalikeducation.in
amnda.in
atmamalikjrcollege.in
८६६९६००७००
८६६९६००९००
+91 7721994411
+91 7743996677
+91 7588694079
+91 9922424796
+91 7588694081
+91 7588694080
+91 9921813275
Mon-Sat: 10AM to 7PM
Sunday: 10AM to 5PM